HOME   लातूर न्यूज

सोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान

बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनचा रौप्य महोत्सव


सोमवारी  कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान

लातूर : येथील बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजता दयानंद सभागृहात खासदार कुमार केतकर यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख उपस्थित राहणार आहेत. फाऊंडेशन यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. हैद्राबाद मुक्ती संग्राम या विषयांवर कुमार केतकर बोलणार आहेत. कार्यक्रमात मुक्ती संग्रामाची चित्रफितही दाखविली जाणार आहे. तसेच भाऊसाहेब उमाटे लिखित ' शौर्यगाथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाची ' या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, धनंजय मुंडे, महापौर सुरेश पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे.
हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानींचा नवीन पिढीला परिचय व्हावा या उद्देशाने बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनने जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन फाऊंडेशनचे सचिव सूर्यकांत वैद्य यांनी केले.


Comments

Top