HOME   लातूर न्यूज

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुकाणू समिती

आमदार अमित विलासराव देशमुख यांची घोषणा


शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुकाणू समिती

लातूर: लातूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या द्ष्टीने संकल्पना मांडणे, योजना तयार करणे आणि त्याची महानगरपालिका तसेच विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून अमंलबजावणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर महानगरपालिका सुकाणू समिती स्थापन केंली आहे. त्यासाठीची कार्यकारीणी अखिल भारतिय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी साधून जाहिर केली आहे.
लातूर शहराच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, ज्यांच्याकडे संकल्पना आणि कार्यक्रम आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे या कामासाठी वेळ आहे. अशा मान्यवर मंडळीना या कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे लातूर महानगरपालिका या कमिटीचे पदसिध्द अध्यक्ष असतील. या कमिटीत निमंत्रीत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष एसआर देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोईज शेख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महिला काँग्रेस अध्यक्षा तथा माजी महापौर स्मिता खानपुरे, माजी उपनगराध्यक्ष किेशोर राजूरे, ख्वाजाबानू बुऱ्हाण, माजी आरोग्य सभापती प्रा.शिवाजी जवळगेकर, तसेच डॉ. बालाजी सांळूके यांचा समावेश करण्यात आला आहे.
लातूर शहर तसेच परिसरातील समस्या, सामाजिक विषय, भविष्यातील संकल्पना, नियोजन या विषयाच्या अनुषंगाने सदरील समिती रचनात्मक कार्य करेल. महापालिका तसेच केंद्र व राज्य शासन, विविध संस्था, संघटना यांच्याकडे जनतेच्या समस्या व रचनात्मक योजनांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी कमिटी कार्यरत राहणार आहे. उद्योग-व्यापार, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील योजनांचे नियोजन करण्यावर या समितीचा भर असेल तसेच कामगार, कर्मचारी व सामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे, त्यांना सर्वस्तरावर मदत करणे. या शिवाय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकात समन्वय राखणे, त्यांना कार्यक्रम आखून देणे, पक्ष पदाधिकाऱ्या समवेत कार्यक्रम आखणे, येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे, काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. लोकसभेचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नेतेमंडळीचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन ही समिती कार्यरत राहिल, असे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top