HOME   लातूर न्यूज

'भिडे वाडा' बचावसाठी चलो परळी..

परळी पंचक्रोशीतून मोर्चाला वाढता पाठिंबा फुलेप्रेमी सोमवारी परळीत धडकणार


'भिडे वाडा' बचावसाठी चलो परळी..

परळी: क्रांतीबा महात्मा ज्योतिराव फुलें व साविञीआई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात एक जानेवारी १९४८ साली सुर केली होती. भारतातील अज्ञानाच्या काळोखात समाज क्रांतीची पहिली ठिणगी, फुले दांपत्याच्या हाताने ज्या भिडे वाड्यात पडली त्या भिडे वाड्याची आज दयनीय अवस्था झाली आहे. देशातील मुलींचे शिक्षण जिथून सुरू झाले तो भिडे वाडा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या वाड्याचे संवर्धन होऊन, त्या ठिकाणी स्ञीमुक्तीचे व फुले विचारांचे स्मारक व्हायला हवे अशी फुले प्रेमी नागरिकांमधून मागणी होत आहे. पुरोगामी भारतातील सामाजिक जिवनात ऐतहासिक महत्व असलेल्या या वाड्याकडे व फुले दांपत्याच्या कार्याकडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाचे लक्ष या गोष्टीकडे वेधण्यासाठी येत्या सोमवारी परळी तहसीलला निवेदन देण्यासाठी शांततामय मार्गाने मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात फुले प्रेमी नागरिक,
माता भगिनी व विद्यार्थीनी बहुसंख्येने सहभागी होणार आहेत.या मोर्च्याला परळी परिसरातील अनेक गावखेड्यातून खूप पाठिंबा मिळत आहे. अनेक गावातील फुले प्रेमी या मोर्च्यासाठी परळीत येणार आहेत. हा मोर्चा श्री संत सावता महाराज मंदिर,परळी वै ,जि.बीड येथुन ०८ ऑक्टोबरला सकाळी ०९ वाजता निघेल. हा मोर्चा राणी लक्ष्मीबाई टॉवर, एक मिनार चौक,शिवाजी चौक मार्गे तहसीलला जाईल. या शांततामय मार्गे निवेदन मोर्चात जास्तीतजास्त फुले प्रेमीं बांधव,माता भगिनी व विद्यार्थीं,विद्यार्थींनीनी सहभागी होण्याचे आवाहन भिडे वाडा बचाव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे..


Comments

Top