HOME   टॉप स्टोरी

आवक काहीच नाही, जावक मात्र सुरुच, मांजराचे हाल

दहा दिवसाला पाणी मिळण्याचा योग, कलेक्टरांची तातडीची बैठक


आवक काहीच नाही, जावक मात्र सुरुच, मांजराचे हाल

लातूर: लातूर शहरपाणी पुरवाणार्‍या मांजरा धरणातील पाणीसाठा मृत साठ्यवरुनही कमी होत चालला आहे. हे पाणी काळजीपूर्वक वापरले गेले तर वर्षभर पुरू शकते. पण त्यातील चोरी, बाष्पीभवन थांबवणे या गोष्टी करण्या आल्याच. आगामी काळ लातूर शहराला दहा दिवसाला पाणी मिळण्याचा योग गोड मानूननच घ्यावा लागेल. मान्सूने पाठ फिरवली तशीस परतीच्या पावसानेही साथ दिली नाही. त्यातूनच लातुरच्या नळांना न बसलेल्या तोट्या, पाणी भरुन झाले की वाहने, घरे धुतणे या गोष्टीही टंचाईला साथ देणार्‍याच आहेत.
उद्या या प्रश्नावर जिल्हाधिर्‍यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यातून निघणार्‍या निर्णयांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.


Comments

Top