HOME   टॉप स्टोरी

हरंगुळजवळ रेल्वे बोगी कारखाना, पलकमंत्र्यांनी केले भूमीपूजन

परदेशातही पाठवणार, हजारो युवकांना मिळाणार रोजगाराची संधी


लातूर: मागच्या अनेक वर्षांपासून मराठवाडा क्षेत्र रोजगारापासून मागे राहिले आहे. लातूर येथे मराठवाड्यातला हा पहिला प्रकल्प रेल्वे बोगी लातुरात होत होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यातून मराठवावड्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल या शिवाय २५ डिसेंबर २०१९ पर्यंत येथून पहिला रेल्वे बोगी बाहेर पडेल त्या प्रमाणे काम होणार आहे अशी माहिती लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या शुभ कार्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे नमूद करून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले रेल्वे च्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीत कोणत्याही प्रकल्पाची सुरवात झालेली नाही. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांर्गदर्शनाचा संगम झाल्यामुळे लातूरच्या रेल्वे बोगी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास आज सुरवात होत आहे. रेल्वे बोगी प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित क्लस्टर युनिट उभारले जाणार आहे. त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी ०३ तारखेला विशेष बैठक बोलावली आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा प्रकल्प होत आहे. अनेक अधिकाऱ्यांची ही इच्छा लातूरला हा प्रकल्प व्हावा अशीच होती असे बोलून पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की लातूरचा रेल्वे बोगी प्रकल्प सीएम वॉर रूम आणि रेल्वे मंत्र्यांचा की प्रोजेक्ट म्हणून दर १५ दिवसाला कामाचा आढावा घेतला जाणार आहे. आई जगदंबेच्या कृपेने मराठवाड्यातील तरुणांना या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली. लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विधीवध पूजा करून करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अभिमन्यू पवार, खा सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, आ. त्र्यंबक भिसे, आ सुधाकर भालेराव, आ विक्रम काळे, रमेश अप्पा कराड, गणेश हाके, महापौर सुरेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, नागनाथ निडवदे, यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.


Comments

Top