HOME   महत्वाच्या घडामोडी

पाकचे भारतात १० सर्जिकल स्ट्राईक, तापमान आणखी वाढणार, इंधनाबाबत पंतप्रधानांची बैठक, जगदंबेला एक किलो सोन्याची बिस्किटं, बॅंकेत घुसला अजगर......१५ ऑक्टोबर २०१८


पाकचे भारतात १० सर्जिकल स्ट्राईक, तापमान आणखी वाढणार, इंधनाबाबत पंतप्रधानांची बैठक, जगदंबेला एक किलो सोन्याची बिस्किटं, बॅंकेत घुसला अजगर......१५ ऑक्टोबर २०१८

* राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांचं तापमान ३५ अंशावर गेलं
* कोरडय़ा वातावरणामुळे १७ ऑक्टोबपर्यंत राज्यातील सर्वच भागांतील कमाल तापमानात होणार वाढ
* अरबी समुद्रातील लुबन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने राज्यात उन्हाचा कडाका
* इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांची आज पंतप्रधानांसोबत बैठक
* ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी नाही, सरकारचा खुलासा
* पेट्रोलचे भाव स्थिर, डिझेलचा भाव ०८ पैशांनी वाढला
* यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या, बछडाही दिसला
* माजी राष्ट्रपती कलाम यांची आज जयंती, सगळीकडे साजरा होणार वाचन दिन
* कोल्हापुरच्या जगदंबा मातेच्या चरणी एका भक्ताने केली सोन्याची एक किलो बिस्किटं
* चीनच्या एका बॅंकेत घुसला दीड मीटर लांबीचा अजगर
* शिक्षण खात्याच्या पवित्र पोर्टल विरोधात ०२ नोव्हेंबर रोजी राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा शैक्षणिक बंद
* 'मी टू'द्वारे नेते आणि अभिनेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - रामदास आठवले
* राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकपदी स्वाती काळे यांची नियुक्ती
* भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंविरोधात जालन्यातून लढणार- आमदार बच्चू कडू
* मुंबईत टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीचे पत्रकार हरमन गोम्स यांच्यावर हल्ला
* पुणे येथे पोलीस वसाहतीत तीन-चार दिवसांपासून पाणी न आल्याने महिलांचा रस्तारोको, पालकमंत्री गिरीश बापट यांना घेराव
* नाशिक जिल्ह्यात नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या ०७ लहान मुलांना अज्ञात वाहनाची धडक, एकाचा जागीच मृत्यू
* नागपुरात शेफ़ विष्णू मनोहर यांचा ०३ हजार किलो खिचडी बनविण्याचा विश्वविक्रम, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आस्वाद
* जगण्यासाठी गड-किल्ले प्रेरणास्त्रोत, मात्र पुतळे उभारण्याची स्पर्धा आणि पुतळ्याच्या उंचीवरून भांडणे करण्यातच आम्ही समाधानी- बाबासाहेब पुरंदरे
* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात पोलिसांवरील हल्ले वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत विचार करु- गृहराज्यमंत्री
* औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयाने हेल्मेट न वापरणार्‍यांकडून दंड वसुलीचे ०३ कोटी २० लाख कमी भरल्याचा कॅगचा आक्षेप
* यवतमाळ जिल्ह्यात दारव्हाचे माजी नगराध्यक्षांची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या, पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय
* अलाहाबादचं नाव ‘प्रयागराज’, करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी
* ४० लाख घुसखोर काँग्रेस, सपा आणि बसपाचे मतदार- अमित शहा
* मध्यप्रदेशात कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत आहात ते स्पष्ट करा- अमित शहा राहुल गांधींना
* जुलैपासून देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडी नोंदणी प्रमाणपत्र असणार एकसारखेच
* अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीने दोन दिवसात विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही तर विद्यापीठ सोडू- १२०० काश्मीरी विद्यार्थी
* महिन्याभरापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले
* आसाममध्ये १९९४ मध्ये झालेल्या ०५ युवकांच्या बनावट चकमक प्रकरणी ०७ लष्करी अधिकाऱ्यांना जन्मठेप
* पाकच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्टाइकला दोन वर्ष उलटले, भारतात १० सर्जिकल स्ट्राइक करु- पाकचे मेजर जनरल आसिफ गफूर


Comments

Top