HOME   लातूर न्यूज

राज्यपाल विद्यासागर राव लातुरात

राज्यपालांची विविध बैठकांना उपस्थिती


राज्यपाल विद्यासागर राव लातुरात

लातूर: महाराष्ट्राचे राज्यपाल के विद्यासागर राव आज लातुरात दाखल झाले आहेत. येथील विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपालांचे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अवतरले. ते येताच पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे आदींनी स्वागत केले. विमानतळावर पोलीस दलाने राज्यपाल राव यांना मानवंदना दिली. राज्यपाल आअज विविध विविध विभागांच्या बैठकीत व्यस्त आहेत.


Comments

Top