HOME   टॉप स्टोरी

फसवी नोटाबंदी, मूळ उद्देश फसला, आर्थिक अस्थिरता मात्र आली

आ, अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने केली निदर्शने


लातूर: नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली. आज लातूरमध्ये कॉंग्रेसच्या वतीने या विरोधात निदर्शने करण्यात आली. ज्या हेतुने नोटबंदी केली गेली आहे तो मूळ उद्देशच फसला आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे सामान्य व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. चलनामध्ये खोट्या नोटांचे प्रमाण वाढले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटबंदी ही तर पार फसली, नोटबंदीने ना काळा पैसा बाहेर आला ना दहशतवादी कारवाया थांबल्या, लोकांना प्रचंड मनस्ताप, नवीन नोटा छपाईसाठी झालेला अवाढव्य खर्च व चलनटंचाईच्या तुटवड़याने बाजारात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. लातूर कॉंग्रेसच्या वतीने आज नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेस भवनाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात लातूर शहरचे आमदार अमित देशमुख सहभागी होते. यावेळी अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, कैलास कांबळे, इमरान शेख, कुणाल वागज, प्रदिप गंगणे याच सोबत शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top