HOME   लातूर न्यूज

शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

०५ ते २५ नोव्हेंबरची मुदत, अर्ज ऑनलाईनही सादर करता येतील


शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

लातूर:-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित असून यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळांडूसह, संघटक / कार्यकर्ते, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षी करीता शिवछत्रपती राज्य्‍ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
२०१७-१८ वर्षासाठीच्या संघटक/ कार्यकर्ते या पुरस्कारासाठीच्या संबधित अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख ०५ ते २५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे. तर आंतराष्ट्रीय/ राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडुंसह, क्रीडा मार्गदर्शक यांचेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख् ५ नोंव्हेबर पर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे. संबधितांनी ऑनलाईन पध्दतीने आपल्या कामगिरीच्या तपशिलासह विहीत नमुन्यातील अर्ज www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज सादर करावा.


Comments

Top