HOME   लातूर न्यूज

विलास को-ऑपरेटिव्ह बँकेकडून सुशिक्षित तरुणांना कर्जसहाय योजना

फिरते मॉल व रेस्टॉरंटचे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते उदघाटन


विलास को-ऑपरेटिव्ह बँकेकडून सुशिक्षित तरुणांना कर्जसहाय योजना

लातूर प्रतिनिधी: विलास को.ऑपरेटिव्ह बॅक लि.च्या वतीने सुशिक्षीत बेरोजगार यांना रोजगारनिर्मीती, उदयोग आणि व्यवसायाकरिता करीता विविध योजना आखण्यात येत आहेत. या योजनेतर्गत सुशील तिवारी (एमबीए) यांना फिरते मॉल व रेस्टॉरंट व्यवसायाकरिता कर्जसहाय करण्यात आले. या फिरत्या मॉल व रेस्टॉरंटचे उदघाटन सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
चेअरमन अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून विलास को.ऑपरेटिव्ह बॅक ली.ने सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध योजना आखत आहे. या योजनेतर्गत बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्माण व्हावा, त्यांना उदयोग, व्यवसाय करून स्वताच्या पायावर उभा राहता यावे यासाठी योजना आखून कर्जसहाय देण्यात येत आहे. या सर्व योजना यशस्वीपणे कार्यन्वीत व्हाव्या याकरीता संचालक मंडळ व प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या योजनेतर्गत सुशील तिवारी यांना फिरते मॉल व रेस्टॉरंट व्यवसायाकरिता कर्ज कर्जसहाय करण्यात आले. या फिरत्या मॉल व रेस्टॉरंटचे उदघाटन सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे चालावा याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच बँकांनी शहरात व ग्रामीण भागात अशाच प्रकारच्या योजना राबवाव्यावात. बॅकेच्या ग्राहकांच्या सोयीसाठी फिरते एटीएम सुरू करून त्यांची व्याप्ती वाढवावी अशी संकल्पना देखील मांडली. लातूर शहर व परिसरात लहान मोठया प्रमाणात व्यवसायीक आहेत. त्यांना व्यवसाय वाढीसाठी कर्जाची आवश्यकता आहे. अशा लघुउद्योगांना कर्जपुरवठा करावा, महिलांनाही लघु उद्योगासाठी अर्थसाह्य करावे अशाही सूचना सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी उपसभापती मनोज पाटील, गोटू यादव, बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते संचालक एस.डी.कातळे, पी.के.कावळे, बी.के घोटाळे, एन.बी.बादाडे, व्ही. व्ही. पुरी, मुख्य अधिकारी के.जी.गहेरवार व कर्मचारीवृद उपस्थित होते.


Comments

Top