logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   लातूर न्यूज

लातूर लोकसभेसाठी विनोद खटके यांचा अर्ज

काँग्रेसकडे मागितली उमेदवारी

लातूर लोकसभेसाठी विनोद खटके यांचा अर्ज

लातूर : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी युवा नेते विनोद खटके यांनी काँग्रेसकडे अर्ज सादर केला आहे. आतापर्यंत केलेली समाज उपयोगी कामे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण मागणी अर्ज केला असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेत सहभागी होत खटके यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्याकडे अर्ज सादर केला.
सामाजिक कार्य करताना विनोद खटके यांनी आपले वेगळेपण जपले आहे. विविध उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत. गरजूना मदत करण्यात ते अग्रभागी असतात. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गोरगरीब नागरिकांना मदत करण्याच्या भावनेतूनच, त्यांनी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतात. बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी नुकताच मेळावाही घेतला होता. या सामाजिक कार्याच्या पाठबळावरच खटके यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाच्या धोरणानुसार आपल्या मागणीचा योग्य विचार होईल असेही खटके म्हणाले.


Comments

Top