HOME   लातूर न्यूज

भारताचे दर्शन घडविणार्‍या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे आज उद्घाटन

डॉ. एस.एन. सुब्बाराव व आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती


भारताचे दर्शन घडविणार्‍या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे आज उद्घाटन

लातूर: भारताच्या विविधतेचं दर्शन घडविणार्‍या १९ व्या राष्ट्रीय आनंद बाल महोत्सवाचे रविवारी सकाळी थोर समाजसेवक डॉ. एस.एन. सुब्बाराव तसेच महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थितीत नवीन एमआयडीसीतील गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात मुख्य उद्घाटन सोहळा होणार आहे
१८ भाषांतील भारत की संतान सोहळा रविवारी शहरात होत आहे़ त्यानिमित्ताने १८ राज्यातील बाल पाहुण्यांनी गोल्डक्रेस्ट हायचे प्रांगण फुलले आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशन संचलित गोल्डक्रेस्ट हाय व नवी दिल्ली राष्ट्रीय युवा योजनेच्या वतीने गोल्डक्रेस्टच्या प्रांगणात राष्ट्रीय बालआनंद महोत्सवास शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी ४ वाजता दीड ते दोन हजार बालक-बालिका व नागरिकांची भव्य राष्ट्रीय एकात्मता सद्भावना फेरी निघणार आहे. ही सद्भावना फेरी क्रीडा संकुलातून निघून शिवाजी चौक - लोकमान्य चौक, गांधी चौक मार्गे राजर्षी शाहू महाविद्यालयात पोहोचून समारोप होईल. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित १८ भाषेतील गीत ‘भारत की संतान’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून बालक - बालिकांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी १८ राज्यातून बाल पाहुणे दोन दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत. शनिवारी थोर समाजसेवक डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी देश की ताकत हम सब बच्चे ही प्रेरणा गीते म्हणत संवाद साधत आहेत. दिवसभरात शहरातील २५ शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होउन आपापले मित्र निवडले. नवीन मित्र जुळल्याने बालकही आनंदी झाले आहेत.


Comments

Top