HOME   व्हिडिओ न्यूज

पानचिंचोली ग्रामपंचायतीच्या नावे बॅंकेत १० लाखांची एफडी

मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून बहुमान


पानचिंचोली: निलंगा तालुक्यात पानचिंचोली हे गाव आहे. हे गाव कोणत्या न कोणत्या विषयांमुळे सतत चर्चेत असते. या गावाची पुन्हा एकदा चर्चा होण्याचे कारण म्हणजे या गावच्या ग्रामपंचायतीने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत १० लाखांची ठेव जमा केली आहे. या गावची लोकसंख्या १० हजार आहे. मागील काही दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमुळे या गावचे नाव सबंध महाराष्ट्रभर गाजले होते. गावाची बाजारपेठ मोठी आहे. ज्यामुळे रोज लाखोंची उलाढाल होते. यातून जो कर जमा झाला आहे त्यातुन ग्रामपंचायतीवर असलेला कर्जाची परतफेड करून ग्रामपंचायतीच्या नावाने १० लाखांची फिक्स डिपॉजीट करण्यात आले आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांच्या गटाकडे ही ग्रामपंचायत असून त्यांनी मागील काही वर्षांपासून विकासकामे केली आहेत. गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, पथदिवे आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे अशी अनेक कामे या काळात झाली आहेत.


Comments

Top