HOME   लातूर न्यूज

कार्तिकीसाठी लातूर येथून खास पंढरपूर रेल्वे गाडी

खा.सुनील गायकवाड यां यांनी केला आज शुभारंभ


कार्तिकीसाठी लातूर येथून खास पंढरपूर रेल्वे गाडी

लातूर: जिल्हयातील भाविक-भक्तांना कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी लातूर-पंढरपूर कार्तिकी रेल्वेचा शुभारंभ खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या कार्तिकी स्पेशल रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रमास महापौर सुरेश पवार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख, बालाजी पाटील चाकूरकर, गुरुनाथ मगे, नागनाथ सरवदे, विजय कुमार गायकवाड, लातूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक विमलकुमार तिवारी, पी.के. मिश्रा, श्रीकांत रंगनाथ उपस्थित होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड म्हणाले की, कार्तिकी एकादशी निमित्त लातूर येथून कार्तिकी स्पेशल रेल्वे बरोबरच बिदर-पंढरपूर, अदिलाबाद-पंढरपूर रेल्वे गाडया खास भाविक भक्तांची सोय व्हावी म्हणून सुरु केलेल्या आहेत. या सुविधेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार गायकवाड यांनी केले.


Comments

Top