HOME   लातूर न्यूज

बीड जिल्हा कारागृहातील २६४ कैद्यांची आरोग्य तपासणी

लातुरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम


बीड जिल्हा कारागृहातील २६४ कैद्यांची आरोग्य तपासणी

लातूर: धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, लातूर व बीड आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २४८ पुरुष व १६ महिला कैदी अशा एकूण २६४ कैद्यांची आरोग्य तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबीरावेळी लातूरचे सह धर्मादाय आयुक्त एम. टी. ठवरे, बीडचे सह धर्मादाय आयुक्त एच. व्ही. कादरी, धर्मादाय उपायुक्त एम. एल. जोगी, बीड जिल्हा कारागृह अधिक्षक महादेव पवार, तुरुंगाधिकारी शरद माळशिकारे, धर्मादायचे रुग्णालय निरीक्षक दिनेश दुपारे, निरीक्षक डी. एल. सावंत, ए. पी. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात विविध आजाराच्या २४८ पुरुष व १६ महिला कैदी अशा एकूण २६४ कैद्यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करुन प्राथमिक उपचार केले व उपस्थित कैद्यांना सुदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबीरात डॉ. राजेश विरपक्षे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. भागवत केंद्रे, डॉ. अनिकेत शेटे, डॉ. वारिसा खान, डॉ. मंजुषा काळे, डॉ. मकरंद वाडवणकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते गणेश कराड, गोविंद डोंगरे, परिचारक आकाश गायकवाड, फर्मासिस्ट एस. के. रासुरे व अरविंद वेदपाठक, अवदुंबर कुपकर, संजय गुळभिले यांनी सेवा बजावली. या शिबीरासाठी सुबेदार अनिल साळवे, एस. जी. अत्तर, हवालदार बाबुराव जाधव, रक्षक आर. ए. बडे, जी. एल. बेले यांनी सहकार्य केले.


Comments

Top