HOME   टॉप स्टोरी

मराठ्यांना १६ टक्के आरक्षण, लातुरात जल्लोष

भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाने मानले सरकारचे आभार


लातूर: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागला. सरकारने आज विधानसभेत हा ठराव मांडला. विधानसभेने तो सार्वमताने मंजूर केला. कुणीही विरोध केला नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी हा ठराव विधान परिषदेत मांडला. विधान परिषदेनेही या आरक्षणाला एकमुखी मान्यता इली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. ठिकठिकाणी जल्लोष झाला. भाजपा आणि मराठा संघटनांनी आपापल्या परिने या निर्णयाचं स्वागत केलं. लातुरच्या शिवाजी चौकात खा. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोबतच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवरायांना अभिवादन करुन सरकारचे आभार मानले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्याने हा विषय आता राज्यपालांकडे जाईल आणि त्याबाबतचा वटहूकूम निघेल. त्यानंतर कुणी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले तर पुन्हा हे आरक्षण रखडू शकते.
शहर भाजपाच्या वतीने फटाक्यांची अतिषबाजी करुन पेढे वाटप करण्यात आले. मराठा आरक्षण विधेयक मंजूरीचा जल्लोष साजरा करण्यासाठी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक अजय कोकाटे, सुनिल मलवाड, देवानंद साळुंके, गुरुनाथ मगे, नगरसेविका स्वाती घोरपडे, श्वेता लोंढे, शोभा पाटील, दिपा गिते, वर्षा कुलकर्णी, शितल मालु, मोहन माने, संतोष भालेकर, सरचिटणीस तुकाराम गोरे, मंडल अध्यक्ष गणेश हेड्डा, ज्योतीराम चिवडे, गोरोबा गाडेकर, शिरीष कुलकर्णी, अभिजीत माचिले आदिंसह नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top