HOME   व्हिडिओ न्यूज

जिल्ह्यातील पिकांवर अमेरिकन अळीचा सर्जिकल स्ट्राईक!

तीन दिवसात पाच एकर मका आणि ज्वारी अळीने केली फस्त


लातूर: मराठवाडा दुष्काळसदृष्य परस्थितीचा सामना करत असताना अजून एक अस्मानी संकट आले आहे. मका आणि ज्वारीच्या पिकांवर अमेरीकन लष्कर अळीचा हल्ला झालेला आहे. लष्करी अळी नवीन नाही मात्र ही अळी अमेरीकन लष्करी आहे. ही बहुभक्षी कीड आहे. यामुळे सर्वच पिकांवर हा प्रादुर्भाव पहावयास मिळतोय. ही प्रजाती प्रथमत: २०१५ साली अमेरिकेत आढळायची या वर्षी ही अळी कर्नाटकात पहावयास मिळाली आणि मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात या अळीचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. या अळीचा आहार अधिक असल्याने ती लवकर पिकांचे शेंडे खाते त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील शंकर मोरगे यांच्या शेतात या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पहावयास मिळाला. दोनवेळा फवारणी करून पण हा प्रादुर्भाव कमी न झाल्याने जिल्हा कृषी अधिकारी डॉ. वसंत सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने या शेताची पहाणी केली आणि त्यावरील उपाय योजनाची माहिती दिली. हा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल यावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी आणि कृषी अधिकारी आणि त्यांचा चमू उपस्थित होता.


Comments

Top