logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

कोचिंग परिसर सिसिटीव्हीमध्ये होणार कैद

शांततेसाठी संचालकांसह पालकांचेही सहकार्य आवश्यक- पोलीस अधीक्षक

कोचिंग परिसर सिसिटीव्हीमध्ये होणार कैद

लातूर: देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात लातूरची एक वेगळी ओळख आहे. मेडिकल, इंजिनिरिंगला लागणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये लातूर शहराचा नेहमीच वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे लातूरमध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची सुरक्षा कायम रहावी यासाठी पोलीस तर नेहमी तत्पर असतातच परंतु कोचिंग यलासेसच्या संचालकांसह पालकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.
शहरातील उद्योग भवनमधील अष्टविनायक मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी पोलीस चौकीचे उद्घाटन पार पडले. यावेळी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील, रेणूकाई कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, आद्योगिक वसाहतीचे संचालक लातूरे अप्पा, अष्टविनायक मंदिरचे सदस्य अभय शहा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, पीआय गजानन भातलवंडे, नानासाहेब लाकाळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना राजेंद्र माने म्हणाले की, लातूर शहर ही शिक्षणाची पंढरी आहे. या शैक्षणिक पंढरीत हौसे-नवसे-गौसे असे सर्वच प्रकाचे लोक भेटतात. त्यामुळे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊन शांततामय वातावरण गढूळ बनते. याचा विशेषत: मुलींना त्रास होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन नेहमी सजग राहते. लातूर पोलीसांकडून दामिनी पथक तसेच चार्ली पथक सक्रिय असतानाही वाढत जाणारे नकोसे प्रकार थांबविण्यासाठी उद्योग भवन परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याची कोचिंग क्लासेसच्या संचालकांसह पालकांचीही मागणी होती. आज या मागणीला आज मूर्त स्वरूप आले असून यानंतरही शहरात शांतता कायम टिकवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात आयआयबीचे लातूर कोआर्डीनेटर विराज पालीमकर, आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, पालक प्रतिनिधी डॉ. भारत घोडके, विद्यार्थीनी कु. तारामती पदमपे यांनीही पोलीस चौकी स्थापण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योग भवन पसिरात आयआयबीच्या पुढाकारातून सुमारे 25 लक्ष रूपये खर्च करून 53 सिसिटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी अति. पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्त केलेल्या चार्ली पथकाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.


Comments

Top