logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

शिवसेनेचे जोडे, मंत्री राम शिंदेंच्या प्रतिमेने खाल्ले!

जनावरे पाहुण्यांकडे सांभाळायला द्या या वक्तव्याचा निषेध

लातूर: सगळा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. अशा अवस्थेत शेती करणे तर सोडून द्या, शेतकर्‍यांना आपले पश्धन सांभाळणेही कठीण झाले आहे. आधी चारा छावण्या सुरु करण्याची घोषणा करणार्‍या सरकारने नंतर चार्‍याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर टाकण्याची घोषणा केली. नंतर याच सरकारचे प्रतिनिधी मंत्री राम शिंदे यांनी अदभूत उपाय सुचविला. जनावरे सांभाळता येत नसतील तर पाहुण्यांकडे सांभाळायला द्या असे वक्तव्य करुन घायकुतीला आलेल्या शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. याचा अर्थ असा की शेतकर्‍यांना पशुधन सांभाळण्यासाठी सरकार कसलीच मदत करणार नाही! यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी आज शिवाजी चौकात राम शिंदे यांच्या प्रतिमेला जाहीरपणे जोडे मारले. राम शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी केली.
यावेळी नामदेव चाळक, संतोष सोमवंशी, महिला संघटक सुनीता चाळक, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर, विष्णु साबदे, महानगर प्रमुख, विधानसभा संघटक ॲड. नरेश कुलकर्णी, शहर प्रमुख रमेश माळी, बालाजी जाधव, महानगर संघटक योगेश स्वामी, उप शहरप्रमूख राहूल रोडे, शिवराज मूळावकर, राजेंद्र कत्तारे, सुधाकर कूलकर्णी, भारतीय कामगार सेना अध्यक्ष विशाल माने, वैभव बिराजदार, सुनील पवार, सुनील सोमवंशी, दिपक आपरे, सूरज झुंजे पाटील, दिनेश जावळे, अक्षय चवळे, अभिजीत गायकवाड यांच्यासह अनेकजण हजर होते.


Comments

Top