logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   लातूर न्यूज

सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला साथ द्या

लोहावासीयांना धीरज देशमुख यांचे आवाहन

सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला साथ द्या

लोहा: राज्यात व देशात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त झाली असून विकास कसा असतो हे काँग्रेसच्या कार्यकाळात दाखवून दिले आहे. त्यामुळे लोहा नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसवेकपदाचे उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी केले. लोहा शहराच्या नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यासभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, आ. अमर राजुरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ. बस्वराज पाटील, आ. वसंतराव चव्हाण, हणमंत बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्यासह 21 शुगरचे समन्वयक विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रशांत घार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना धीरज विलासराव देशमुख म्हणाले की, खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात लोहा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी देवून लोहावासियांना विकासाची खंबीर साथ दिली होती. येणार्‍­या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जनता निश्चीतपणाने काँग्रेसच्या हातात सत्ता देणार असून जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे लोहा मतदार संघातील जनतेने काँग्रेस पक्षाला खंबीर अशी साथ देत काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून देतील असा विश्वास याप्रसंगी देशमुख यांनी व्यक्त केला. या सभेत खा. अशोकराव चव्हाण यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर टीका करून काँग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांची माहिती दिली. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आ. बस्वराज पाटील यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांना काँग्रेसच्या धोरणांची माहिती दिली. या प्रचार सभेस नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top