logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धे ११० संघांचा सहभाग

देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव ठरणार

मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धे ११० संघांचा सहभाग

लातूर: देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव ठरत असलेल्या मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चषकातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या हस्ते तर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत विधानसभेतील तब्बल ११० संघांनी सहभाग नोंदवलेला असून या स्पर्धा चुरशीच्या ठरत आहेत.
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री चषक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध क्रीडा व कला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क आकारण्यात येत नाही. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री चषक क्रिडा स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेअंतर्गत घेण्यात येणार्‍या क्रिकेट स्पर्धा शहरातील टाऊन हॉल मैदानावर सुरु आहेत. उदघाटनावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या क्रिकेट स्पर्धेत तब्बल ११० संघांनी सहभाग नोंदवलेला असून विशेष म्हणजे यामध्ये तरुणींच्या संघांचाही समावेश आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिला सामना जिल्हाधिकारी संघ विरुध्द केशवराज संघ यांच्यात पार पडला. या सामन्यात जिल्हाधिकारी संघाने केशवराज संघावर मात केली. या नंतर भाजपा नगरसेवक व जिल्हाधिकारी संघ यांच्यात दर्शनी सामना घेण्यात आला होता. या सामन्याचा आनंद प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात लुटला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश गोमचाळे, प्रेरणा होनराव, डॉ.धनंजय पडवळ, राहूल पाटील यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


Comments

Top