logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   टॉप स्टोरी

अशी चालते व्हीव्हीपीएटी मतदान यंत्रणा

लातूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीस सुरूवात

लातूर: राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमे अंतर्गत राज्यभरात व्हीव्हीपीएटी मतदान यंत्रणेचे प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी निवडणुकांना समोर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनाजागॄती मोहिम चालू आहे. याचाच भाग म्हणूण आज लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये हा स्टॉल लावण्यात आला होता. काही दिवसांपुर्वी ०५ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात VVPAT मशीनचा वापर करण्यात आला. आता येणार्‍या निवडणुकांमध्येही EVM मशीन सोबत VVPAT या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी ही प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येत आहेत. मतदाराने मतदान केल्यानंतर VVPAT मशीनमध्ये ७ सेकंदासाठी आपण टाकलेले मतदान त्याच उमेदवारस गेले आहे की नाही हे पाहता येईल. यामुळे EMV मशीनबातत जे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले होते त्यास आता आळा बसेल असे सांगण्यात आले. मतदार आपल्या मताची पुन्हा पडताळणी करू शकणार आहेत. या मोहिमेची सुरुवात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातून प्रशिक्षित कर्मचार्‍यांमार्फत याबाबतची जनजागॄती करण्यात येते आहे.


Comments

Top