HOME   व्हिडिओ न्यूज

बाळासाहेबांची जयंती: सेनेचे रक्तदान शिबीर

दोन दिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


लातूर: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्ताने आज शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्या आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव चाळक यांनी कोरे गार्डन भागातील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोरे या शिबीराचे आयोजन केले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीमुळे आज आणि उद्या लातूर शहरात सांस्कृतीक, सामाजिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शालेय साहित्यांचे वाटप, फळवाटप रक्तदान शिबीर, रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडी वाटप असे विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेने केल्याचे चाळक यांनी सांगितले. शिवसेना ही गरजवंताची मदत करत असते. या रक्तदान शिबीरामार्फत शहरात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न शिवसेना करते आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी विष्णू साबदे, शंकर रांजणकर, यौगेश स्वामी, अ‍ॅड. राहूल मातोळकर, कुलदीप सुर्यवंशी, नरेश कुलकर्णी, खंडू जगताप, रमेश माळी, शिवराज मुळावकर, अमर बुरबुरे, राहूल रोडे, अजित सोमवंशी, दिनेश जावळे, जिवन मुर्गे, विष्णू तिघीले, पवन जोशी, सौरभ बुरबुरे, अक्षय चेवले यासह शिवसैनिक उपस्थित होते.


Comments

Top