logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

मनपा कर्मचारी बेमुदत संपावर

वेतनासाठी आंदोलन तीव्र, ठिय्याही दिला, उपमहापौरांचा पाठिंबा

लातूर: वेळोवेळी निवेदने देऊन ही महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर नसल्याचा आरोप रमाकांत पिडगे यांनी केला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपासह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे थकित वेतन तात्काळ अदा करावे, निवृत्ती वेतन एक तारखेला देण्यात यावे, तसेच कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी अशा मागण्यांसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. मात्र प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सर्वच प्रवर्गामधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास हे काम बंद आंदोलन चालूच राहिल असे पिडगे यांनी सांगितले. या आंदोलनास आपला या पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री हा विषय कायमचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे उपमहापौर देविदास काळे यांनी सांगितले. या आधीच्या सत्ताधार्‍यांनी ही वेळ आणली आहे. अभिमन्यू पवार, पालकमंत्री संभाजी पाटील या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही काळे म्हणाले.


Comments

Top