HOME   टॉप स्टोरी

शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली कुठे?- आदित्य ठाकरे

शिवसेना मदत करणार, पेठला घेतली शेतकर्‍यांची भेट, चारा दिला


लातूर: एप्रिल-मे मध्ये येणारा दुष्काळ यंदा ऑक्टोबरमध्येच आला. दुष्काळग्रस्तांचा आवाज कुणी ऐकत नाही. सेनेनं मदत केली आहे आणि करीत राहणार असं वचन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. ते पेठ येथे बोलत होते. यावेळी त्यांनी एका शेतकर्‍याया घरी जाऊन भेट घेतली, विचारपूस केली. जनावरांना चारा दिला.
या प्रसंगी बोलताना त्यांनी कर्जमाफीचे वाभाडे काढले. ऐतिहासिक कर्जमाफी असे फलक लावतात, झालीय का कर्जमाफी असा प्रश्न त्यांनी विचारताच नाही असे उत्तर जमलेल्या लोकांनी दिले. यावेळी खा. रवींद्र गायकवाड, दिनकर माने, शिवसेना जिल्हाध्यक्ष नामदेव चाळक, सुनिता चाळक, संतोष सोमवंशी, शोभा बेंजरगी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुढे आदित्य ठाकरे चलबुर्गा आणि किल्लारीकडे रवाना झाले.


Comments

Top