HOME   लातूर न्यूज

शेतकर्‍याचे दोन लाख लुटणार्‍या दोघांना अटक

लातुरच्या स्थानकावर कापला होता खिसा, १,६५,००० चा ऐवज जप्त


शेतकर्‍याचे दोन लाख लुटणार्‍या दोघांना अटक

लातूर: लातुरच्या बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका शेतकर्‍याचा खिसा कापून दोन लाख रुपये लांबवणार्‍या चोरट्यांना अटक केली आहे. हे दोन्ही चोरटे बीड जिल्ह्यातील असून चर्‍हाटा फाटा येथे या दोघांना लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख १ लाख ६५ हजा रुपयांचा ऐवज मोबाईलसह जप्त केला.
२३ जानेवारी रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास उमरगा तालुक्यातील एकोंडी रोड येथील व्यापारी संतोष दहिटणे शेतमालाचे दोन लाख घेऊन पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा खिसा कापला. लातुरसे एसपी राजेंद्र माने आणि अपर पोलिस अधिकारी काकासाहेब डोळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यावर सोपवली. त्यानुसार सपोनि सुनील रेजीतवाड, अंगद कोतवाड, राम गवारे, नामदेव पाटील, युसूफ शेख, राजाभाऊ मस्के, नागनाथ जोंधळे यांचे पथक नेमण्यात आले. सायबर सेलला मोबाईलवर चोरटे चंद्रकांत गायकवाड आणि रामकृष्ण जाधव चर्‍हाटा फाटा येथे असल्याचे समजले. त्यानुसार तपास केला असता हे दोघे अट्टल चोरटे सापडले. त्यांच्याकडून जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


Comments

Top