HOME   लातूर न्यूज

पत्रकारांच्या पुरस्कारांचे १७ रोजी वितरण

लातूर पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला मंत्री सुभाष देशमुख येणार


पत्रकारांच्या पुरस्कारांचे १७ रोजी वितरण

लातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रका संघाच्यावतीने जाहिर करण्यात आलेल्या दर्पण पुरस्काराचे वितरण राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत रविवार १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांचा जीवन गौरव तर युवा पत्रकारासाठी उत्कृष्ट वार्ता, शोधवार्ता, अग्रलेख, दिवाळी अंक, वृत्तवाहिनी गटात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा दर्पण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस. एम. देशमुख, राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहसंचालक यशवंत भंडारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे, झटींग म्हेत्रे व अन्य पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा यांचा गौरव करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पूर्णानंद मंगल कार्यालय सावेवाडी येथे दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार बांधव व मित्र परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, उपाध्यक्ष महादेव कुंभार, सचिव सचिन मिटकरी, सहचिटणीस संगमेश्‍वर जनगावे, श्रीनिवास सोनी, कोषाध्यक्ष काकासाहेब घुटे, प्रांत प्रतिनिधी त्र्यंबक कुंभार, सदस्य संगम कोटलवार, रघुनाथ बनसोडे, वामन पाठक, गणेश होळे, रोहीदास कलवले, विश्‍वनाथ काळे, सुनिल हवा, मोहन क्षिरसागर, बालाजी पिचारे, वसंत सुर्यवंशी, बाबन अत्तार, महताब शेख, दत्तात्रय पाटील, सौ. चंद्रकला शरद सोनवळकर यांनी केले आहे.


Comments

Top