logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

पुन्हा मोदीच का? पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

१५ फेब्रुवारीला दयानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन

पुन्हा मोदीच का? पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लातूर: ज्येष्ठ पत्रकार व प्रख्यात व्याख्याते भाऊ तोरसेकर लिखित 'पुन्हा मोदीच का?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी लेखक, पत्रकार भाऊ तोरसेकर, भाजपाचे लातूर लोकसभा प्रभारी अ‍ॅड. मिलिंद पाटील, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्काय फाऊंडेशन, लातूर व पंडित दिनदयाल फाऊंडेशन लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी कांही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभर निवडणुकांचे वातावरण ढवळत आहे. याच विषयाला अनुसरून भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा खास लातूरकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाऊ तोरसेकर आपल्या परखड वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे विचार व्यक्त करणार आहेत. दयानंद सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास लातूर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शैलेश गोजमगुंडे, प्रवीण सावंत व पंडीत दिनदयाल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Comments

Top