logo

HOME   टॉप स्टोरी

लातुरचे पत्रकार मार्केटींग करण्यात हुशार- मंत्री सुभाष देशमुख

तिघांना जीवन गौरव, विविध गटातील स्पर्धेच्या पारितोषिकांचे पत्रकारांना मंत्र्यांकडून वितरण

लातूर: उस्मानाबादमधून बाहेर पडलेला लातूर जिल्हा खूप पुढे गेला आहे. या जिल्ह्याचा नावलौकीक मोठा आहे. अर्थात याचे श्रेय इथल्या पत्रकारांचे आहे. मार्केटींग करण्यात ते तरबेज आहेत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. इथे मी पत्रकारांना काय मार्गदर्शन करावे? तुमचे दर्शन व्हावे म्हणून इथं आलो असेही ते म्हणाले.
लातूरच्या जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणार्‍या दर्पण आणि जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकारांनीच आपल्याला घडवलं असं पवार म्हणाले. पूर्णानंद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे, दर्पण पुरस्कार, संजीव पाटील, बाळासाहेब जाधव, विनोद उगिले,
रवींद्र भताने, परमेश्वर शिंदे, संदीप अंकलकोटे, पीआर पाटील, मैनोद्दीन, पंकज जैस्वाल, अशोक हनमंते, मजहर पटेल, हारुण सय्यद,
रामेश्वर बद्दर, गणेश होळे, दत्ता परळकर, सिद्धार्थ सूर्यवंशी आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सर्व पत्रकारांची कार्यालये एकत्र असावीत यासाठी जागा द्यावी, पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सहकार्य करावे अशी विनंती पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी प्रास्ताविकात केली.


Comments

Top