logo

HOME   लातूर न्यूज

आज नांदेड येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महा आघाडीची सभा

अधिकाधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे- आ. अमित देशमुख

आज नांदेड येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महा आघाडीची सभा

लातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आयोजित केली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेस लातूर जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहाणार असून माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे ही आपल्या सहकाऱ्यांसह या सभेस उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत. यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनीही या सभेस उपस्थित राहवे, असे आवाहन त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Comments

Top