HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेसचा सोशल मिडिया सज्ज

विलासरावांच्या पुतळा अनावरणाचा सर्वदूर प्रसार करण्याचे आवाहन


कॉंग्रेसचा सोशल मिडिया सज्ज

लातूर: काँग्रेस पक्षाने व लातूरचे भाग्य विधाते विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा, विकास, रेणा, जागृती या कारखान्यांच्या माध्यमांतुन ग्रामीण माणसांला आर्थिक सक्षम बनवले आहे. व त्याची पत वाढविण्यांचे काम करून राज्यात लातूर पॅटर्न निर्माण केला आहे. असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एसआर देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ते लातूर जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस च्या वतीने लोकनेते श्रद्धेय विलासराव देशमुख साहेबांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण व लोकार्पण सोहळा पूर्व तयारी निमित्त आयोजित लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मिडीयाच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना एस आर देशमुख म्हणाले की लातूर जिल्हा विकासात लोकनेते विलासराव देशमुख यांनी राज्यात नावलौकिक मिळविला तसेच काम सोशल मीडिया चे लातूरचे नाव राज्यात व्हावे असे सांगून लातूर जिल्हा सोशल मीडियाच्या कामाचे कौतुक करून २४ फेब्रुवारी होणाऱ्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून त्या कार्यक्रमासाठी आपल्या माध्यमातून जिल्हाभर प्रचार प्रसार करावा अशी सूचना करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख होते .रेणा साखर कारखाण्यांचे संचालक प्रवीण पाटील ,लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे सोशल मिडीया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी मोईज शेख यांनी आपल्या जिल्यातील सोशल मीडिया नेटवर्क मधून काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रसार करण्याबरोबरच ध्येय धोरणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन त्यांनी केले
जिल्हा सोशल मीडिया चे कार्य खूप छान असून लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील यांनी केले.
जिल्यातील सोशल मीडिया सज्ज
लातूर जिल्ह्यतील सर्व विधानसभा क्षेत्रात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार कार्य करण्याची जवाबदारी आमची असून जिल्यातील ४५० गावात आमच्या नेटवर्क मधून लोकांपर्यंत आम्ही प्रिंट, सोशल मीडिया फेसबुक ट्विटर च्या माध्यमातून प्रचार प्रसार करू अशी ग्वाही जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी दिली. बैठकीला प्रवीण सूर्यवंशी (लातूर शहर) नरेश पवार (लातूर ग्रामीण) दत्ता बनाळे(लातूर तालुका) प्रा, सिद्धार्थ चव्हाण (रेणापूर) विजय कदम (भादा सर्कल) राजकुमार पाटील (अहमदपूर) प्रा आ ना शिंदे (चाकुर) अमोल घुमाडे(उदगीर) प्रा. ए म पी देशमुख (लातूर) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला देशाचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश पवार यांनी केले.


Comments

Top