HOME   व्हिडिओ न्यूज

मनपा आयुक्त दिवेगावकरांची बदली

११ महिन्यात दिवेगावकरांनी अनेक विभाग आणले शिस्तीत


लातूर; लातुरचे सुपुत्र कौस्तुभ दिवेगावकर लातुर मनपाचे आयुक्त म्हणून अकरा महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. त्यांची आज बदली झाली आहे. पुण्याला भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) विभागाचे संचालक म्हणून दिवेगावकरांना वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. तरुण, उमदा सकारात्मक दृष्टी असणारा अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक झाला होता. स्वच्छता, पाणी पुरवठा, शहराचे सुशोभिकरण अशा अनेक महत्वाच्या कामात त्यांचा ठसा उमटला होता. आज साडेचार वाजता त्यांना आदेश मिळाला. पावणेपाच वाजता त्यांनी कायदेशीररिता कार्यभार सोडला. त्यांच्या बदलीची बातमी जीएसडीएला आधी समजली. त्यांनी तातडीने दिवेगावकरांची भेट घेऊन ‘वेलकम’ केले. कार्यालय सोडताना काही कर्मचारी, काही पत्रकार आणि एक नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे एवढीच माणसे होती. त्यांच्यासाठी नेहमीसारखा निरोप समारंभही आयोजित केला गेला नाही. एवढा कोतेपणा लातुरात पहिल्यांदाच पहायला मिळाला. इथून काय नेत आहात असा प्रश्न विचारला असता, ‘अनुभव’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.


Comments

Top