HOME   टॉप स्टोरी

सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री दुग्धाभिषेक


लातूर: लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर रत्नेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. ६६ व्या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ मध्यरात्री साडेबारा वाजता गवळी समाजबांधवांच्या वतीने दुग्धाभिषेकाने तर सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सपत्नीक महापूजेसह ध्वजारोहणाने झाला. १५ दिवस चालणार्‍या या यात्रा महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. या प्रसंगी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मदाय उपायुक्त श्रीमती यु. एस. पाटील, विश्‍वस्त विक्रम गोजमगुंडे, अरविंद सोनवणे, अशोक भोसले, मन्मथअप्पा लोखंडे, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, सुरेंद्र पाठक, चंद्रकांत परदेशी आदींची उपस्थिती होती.
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर रत्नेश्‍वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. सोमवार दि. ४ मार्च ते १८ मार्च या कालावधीत पार पडणार्‍या या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करून झाला. आज सकाळी ९.३० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सपत्नीक सिध्देश्‍वराची महापूजा करण्यात आली. यानंतर सिध्देश्‍वर मैदान परिसरात ध्वजारोहण करून सदर यात्रा महोत्सव प्रारंभ झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केली. या पूर्वी संतसावता माळी भजनी मंडळाच्या वतीने संत सावता माळी यांची मिरवणूक काढून माळी समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. १५ दिवस चालणार्‍या या यात्रा महोत्सवात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक यासह मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी लातूर शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर्षी यात्रा महोत्सवात काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यात्रा महोत्सवाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या प्रसंगी देवस्थानचे प्रशासक तथा धर्मदाय उपायुक्त श्रीमती यु. एस. पाटील, विश्‍वस्त विक्रम गोजमगुंडे, अरविंद सोनवणे, अशोक भोसले, मन्मथअप्पा लोखंडे, बाबासाहेब कोरे, नरेशकुमार पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, सुरेंद्र पाठक, चंद्रकांत परदेशी यांच्यासह व्यंकटेश हालिंगे, ओकप्रकाश गोपे, राजेश्‍वर अंकलकोटे, राजेंद्र पतंगे, सतीश हलवाई, विशाल झांबरे, दीपक खंडेलवाल, सुरज मुळे, सिध्देश्‍वर धायगुडे, राम चलवाड आदींसह देवस्थानचे विश्‍वस्त, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top