logo

HOME   लातूर न्यूज

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद

शासन निर्णयास विरोध; दयानंद शिक्षण संस्थेचा जाहीर पाठींबा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद

लातूर : राज्य शासनाच्या वतीने एकाकी पदाबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द केला जात नसल्याच्या विरोधात राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर महासंघ बेमुदत संपावर गेला असून यात कर्मचारी बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत पहिल्या दिवशीचा संप यशस्वी केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ०७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे दाद मागितली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. या जाचक निर्णयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे ०५ मार्चपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले आहेत. दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील कर्मचारी बंधू आणि भगिनींनी या संपात १०० टक्के सहभाग नोंदवला. दरम्यान, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देत दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी संपकऱ्यांची भेट घेतली. शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन कार्यात अडसर येऊ शकते त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या या संपाला मुंबई येथील प्राचार्य संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी तथा स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड अशासकीय कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव धनराज जोशी, रामकृष्ण सलगर, युनिट प्रमुख रमेश देशमुख, लक्ष्मीकांत वाघ, सुनिल खडबडे, सुदाम सातपुते, कार्यालयीन अधीक्षक सुधीर तिवारी, रूपचंद कुरे, नवनाथ भालेराव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Comments

Top