logo

HOME   लातूर न्यूज

लोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या

लातूरच्या व्यापार्‍यांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट

लोकसभेच्या जागेसाठी डॉ.गायत्री सोलंकी यांना उमेदवारी द्या

लातूर: येथील एका व्यापारी शिष्टमंडळाने जालना येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेवून लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपातर्फे डॉ.गायत्री सोलंकी(इंगळे) यांना उमेदवारी देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. लातूर लोकसभा मतदार संघातील विविध व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात होते. व्यापक स्वरुपातील या शिष्टमंडळाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जवळपास एक तास वेळ दिला. प्रारंभी डॉ.गायत्री सोलंकी यांनी स्वतःचा परिचय करुन देवून, त्यांना उमेदवारी देण्याची विनंती केली. त्यानंतर वीरशैव समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष चंदू बलदवा, केमिस्ट ड्रगिस्ट असोचे सचिव रामदास भोसले, लातूर व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्‍वनाथ किनीकर, ज्येष्ठ उद्योजक बसवणप्पा पाटणकर आदींनी डॉ. गायत्री सोलंकी यांना उमेदवारी दिल्यास मतदार संघातील व्यापारी वर्ग या उमेदवारीचे स्वागत करेल असे स्पष्ट केले. यावेळी लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय करुन दिला. शिष्टमंडळात भारत माळवदकर, आशिष अंबरखाने, अजय गोजमगुंडे, संजय वर्मा, संजय अग्रवाल, अमित ईटकर, निसार विंधानी, प्रदीप पाटील, फिरोज पानगावकर, जिगर बावटिया, संग्राम जमालपूरे, प्रा.दत्तात्रय पत्रावळे, राजकुमार डावरे, राजू अवसकर, राजेश वडेर, गोविंद पारीख, गोपाळ झंवर, भावेश गांधी, राधाकिशन चांडक, अरुण सोमाणी, प्रतिक माने, लक्ष्मण गायकवाड, चंपाताई जमालपूरे, सुभाष शेरेकर, अभिजित अहेरकर आदींची उपस्थिती होती.


Comments

Top