logo

HOME   टॉप स्टोरी

कॉंग्रेसकडून जेवणाचे रिकामे डबे

या डब्यात भाकरी कुणी घालायची? सफाई कर्मचार्‍यांच्या क्रूर चेष्टेचा अघोरी नमुना

लातूर: लातूर युवक कॉंग्रेसच्या वतीने मनपातील सुमारे दोनशे सफाई कामगारांना खास भेट देण्यात आली. कॉंग्रेस भवनात या कर्मचार्‍यांना बोलावून प्लास्टीकच्या टिफीन बॉक्सचे वितरण करण्यात आले. डबे तर मिळाले पण त्यात भाकरी कधी येणार? असा प्रश्न अनेकजण विचारत होते. कॉंग्रेसने जखम केली अन त्यावर भाजपाने मीठ चोळले अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लातूर युवक कॉंग्रेस मार्फत महिला सफाई कर्मचार्‍यांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यामधील सर्व महिला सफाई कर्मचा‍र्‍यांना जेवणाचा रिकामा डबा देवून गौरवण्यात आले. २०० महिलांना डबे देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या महिलांचे समाजातील योगदान हे कौतुकास्पद असल्याचे माजी महापौर स्मिता खानापूरे यांनी सांगितले. यामधून प्रवर्ग ०४ च्या कर्मचार्‍यांचा सत्कार केला आणि त्यांना जेवणाचे डबे भेट देण्यात आले. यावेळी स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी मोईज शेख, स्मिता खानापूरे, मोहन सुरवसे, सुपर्ण जगताप, उषा भडीकर, सपना किसवे, संजय कांबळे, महेश काळे यासह सफाई कर्मचारी उपस्तिथ होते.


Comments

Top