HOME   लातूर न्यूज

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी जीआर सरवदे यांची निवड


महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

लातूर : लातूर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक दयानंद विधी महाविद्यालय येथे सत्यनारायणजी भुतडा यांच्या अध्येक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे आयोजन महासंघ प्रतिनिधी धनराज जोशी यांनी केले होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी बहुमताने नूतन कार्यकारिणीची निवड केली. यामध्ये अध्यक्ष जीआर सरवदे (शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी), कार्याध्यक्ष सातलिंग गौड (शिव जागृती महाविद्यालय, नळेगाव), सरचिटणीस दत्तात्रय आळंदकर (दयानंद विधी महाविद्यालय, लातूर) चिटणीस सुनील खडबडे (दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर) कोषाध्यक्ष रत्नेश्वर स्वामी (महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर) उपाध्यक्ष विजय जागले, संजय सूर्यवंशी, ज्ञानोबा शिरसाठ, सहसचिव चंद्रकांत तिडके, दत्त गंगणे, सूरज स्वामी, तालुका संपर्क प्रतिनिधी देवणी महेश मोरे, जळकोट शिवकांत मुगळे, अहमदपूर गोपाळ इंद्राळे, चाकूर श्रीराम केंद्रे, निलंगा डीजी माने अशी कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. सल्लागार सुधीर तिवारी, धनराज जोशी, युवराज साळुंके, रमेश देशमुख, सत्यनारायण भुतडा, रुपचंद कुरे, ज्ञानोबा येमले, श्री सोमवंशी यांची निवड करण्यात आली. या निवडी नंतर महासंघ प्रतिनिधी धनराज जोशी, सत्यनारायणजी भुतडा यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये सर्व कामे चालू केल्याबद्दल कूलगुरु उद्धव भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. अंशदायी पेंशन योजना व सातवा वेतन आयोग याबाबत चर्चा करण्यात आली.


Comments

Top