• 20 of March 2018, at 7.23 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

कॉंग्रेसचे नगरसेवक करतात गोविंदपुरकरांविरुद्ध कट- शैलेश गोजमगुंडे

मला काही मिळत असेल तर इतरांचा विचार करु हे कॉंग्रेसचं धोरण!

लातूर: स्थायी समितीच्या बैठकीत कॉंग्रेसचेच नगरसेवक सभापतींविरुद्ध कट करताना दिसले. मला काही मिळत असेल तरच मी इतरांचा विचार करेन ही वृत्ती कॉंग्रेसजनांमध्ये आहे. याच कॉंग्रेसच्या काळात १०० कोटींचा निधी परत गेला असा आरोप भाजपाचे सभागृह नेते शेलेश गोजमगुंडे यांनी आजलातूरशी बोलताना केला. स्थायी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.
अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टे विकसित करण्यासाठी सरकारने निधी मंजूर केला. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या निधीचा विनियोग करण्यासाठी तातडीने ठराव व्हायला हवा अन्यथा हा निधी परत जाईल असे बजावण्यात आले होते. आम्ही यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला. मनपात कॉंग्रेसचे सदस्य विकास कामात खोडा घालतात, अडथळे आणतात. हीच परंपरा सात महिन्यांपासून पहायला मिळते. हरित पट्टे विकसित करण्यासाठी जे पट्टे पहिल्या टप्प्यात निवडले गेले त्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागांची निवड केली गेली असा आरोप करीत कॉंग्रेसचे नगरसेवक सभागृहाची दिशाभूल करीत होते. आम्ही विकासासाठी सकल लातुरचा विचार करतो. सगळं लातूर आमचं आहे. काम करायचं नाही आणि करु द्यायचं नाही असा कॉंग्रेसचा प्रयत्न असतो. मला काही मिळत असेल तरच मी लोकांचा विचार करीन अशी वृत्ती कॉंग्रेसमध्ये दिसते असाही आरोप शैलेश गोजमगुंडे यांनी केला.


Comments

Top