logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   व्हिडिओ न्यूज

डॉक्टरांचा बंद, ५०० जण सहभागी, नव्या विधेयकाला विरोध

ओपीडी बंद राहिल्याने रुग्णांची गैरसोय, अत्यावश्यक सेवा मात्र सुरु

लातूर: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात आज ०२ जानेवारी रोजी लातूर शहरात आयएमएने बंद पाळला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी भालचंद्र ब्लडबॅंकेमध्ये सर्व डॉक्टरांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक आज संसदेत पारित होत असून या विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे. देशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात लातूर आयएमएसुद्धा सहभागी झाले आहे. लातूर शहरातील ५०० डॉक्टरांनी आपापल्या ओपीडी बंद ठेऊन सक्रीय सहभाग नोंदवला. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोयीचे आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढेल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फीवर ४० टक्क्यांपर्यंत जागावर शासनाचा निर्बंध राहील. ६० टक्के जागांबद्दल व्यवस्थापनाला अधिकार राहील. फी भरमसाठ वाढवण्यात येईल. दंडाद्वारे आकारण्यात येणारी रक्कम ५ कोटी ते १०० कोटी राहू शकते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणार आहे. आयोगात फक्त ०५ राज्यांचे प्रतिनिधी राहतील. उर्वरीत २५ राज्ये दुर्लक्षित राहतील असे यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाडांनी सांगितले. ही बैठक भालचंद्र ब्लडबॅंकेमध्ये पार पडली. त्यामध्ये डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अभय कदम, डॉ. अमीर शेख, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. परमेश्वर सुर्यवंशी, डॉ.ओम भोसले, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. इश्वर राठोड, डॉ.सुरेखा काळे, डॉ.स्नेहल देशमुख व आयएमएचे अन्य सदस्य उपस्थित होते.


Comments

Top