logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   व्हिडिओ न्यूज

अमृतने फोडली जुनी पाईपलाईन, गळती सुरुच, खड्ड्यात पडले अनेकजण

प्रभाग १० चे गार्‍हाणे: कॉंग्रेस नगरसेवकांना कुणी विचारत नाहीत, अधिकारी दाद देत नाहीत

लातूर: लातूर शहरात अमृत पेयजल योजने अंर्तगत पाइपलाईनचे कामे चालू असून या कामामुळे नागरिकांना अपूर्ण कामांचा त्रास होतो आहे. प्रभाग १० मध्ये सुभेदार रामजी नगर या भागात मागील एक महिन्याखाली पाइपलाईनचे काम झाले आहे. अद्यापपर्यंत तरी खोदलेल्या रोडचे पॅचवर्क न झाल्यामुळे रस्त्यांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढ्ले आहे. गेल्या १५ दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. रस्त्यावरून ये-जा करतेवेळी यामध्ये अनेक जण पडत आहेत. या भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासकीय अधिकारी व मनपा दूलक्ष करते आहे. काल याच खड्ड्यामध्ये एक आजी पडल्या. कशा तरी बचावल्या, त्यांचं काही झालं असतं तर कोण जबाबदार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या प्रभागात सगळे नगरसेवक कॉंग्रेसचे असल्यामुळे या प्रभागातील कामे जाणीवपूर्वक टाळण्यात येतात असा आरोप केला जात आहे. ही पाइपलाईन करतेवेळी समांतर पाइपलाईन फ़ुटली आहे. ती दुरूस्त करण्याची विनंती केली पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. संबधित अधिकारी फ़ोनही घेत नाहीत. कलावती गायकवाडांच्या घरासमोर हा खड्डा आहे. त्यांचा घरातील लहान मुलं या खड्ड्यात पडून जखमी झाली आहेत. नगरसेवकांनी तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. पाइपलाईन दुरूस्त करूनही पाण्याची गळती चालूच आहे. याच्या निषेधार्थ खड्ड्यांचे सुशोभिकरण करुन त्यात फ़ुगे सोडण्यात आले. यावेळी कल्पना पंडीत, कावेरी भालेराव, भाऊसाहेब गायकवाड, अजय कांबळे, शोभा राऊत, तारमती गायकवाड, वनमाला सुरवसे, अ‍ॅड. सचिन कांबळे, प्रितेश सुरवसे, आकाश भगत, अक्षय पडिले यावेळी हजर होते.


Comments

Top