logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   लातूर न्यूज

जनतेच्या मनातील वादळ सत्ता परिवर्तन घडवेल- बाळासाहेब थोरात

कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार

जनतेच्या मनातील वादळ सत्ता परिवर्तन घडवेल- बाळासाहेब थोरात

लातूर: कोणतेही सरकार असो ते प्रजेसाठी आईच्या भुमिकेत वावरणे अपेक्षित असते. परंतू सध्या राज्यातील परिस्थिती वाईट आहे. तसे पाहायला गेले तर सामान्य, कष्टकरी जनतेसाठी संपुर्ण राज्यातील परिस्थिती बिकट आहे. या सरकारने सर्वांचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे येणारे २०१९ वर्ष निर्णायक ठरणार आहे. सर्वत्र बदलाचे वारे सुरु झाले आहे. आगामी निवडणुकामध्ये या वाऱ्याचे रुपांतर वादळात होऊन सत्ताबदल घडून येईल असा आशावाद काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजीत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभात माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तथा आमदार अमित देशमुख, ग्रामीणचे आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, मनपा स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, विरोधी पक्ष नेते दीपक सूळ, लातूर पंचायत समिती सभापती शीतल फुटाणे, उपसभापती दत्तात्रय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या राज्य आणि केंद्रातल्या सरकारने तीन वर्शात सामान्य जनतेच्या हितासाठी एकही निर्णय घेतलेला नाही. रात्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरु झाल्यानंतर काँगेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर दबाव वाढवला, आंदोलने केली, शेतकरी मोठ्या संख्योने या आंदोलनात सहभागी होऊ लागले. त्यामुळे इच्छा नसताना केवळ दबावात येऊन या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. दातृत्वाची भावनाच नसल्यामुळे मग कर्जमाफी टाळण्यासाठी अनेक उपाय शोधण्यास सुरु केले, ऑनलाईन अर्ज भरुन घेताना वेळकाढुपणाचा मार्ग निवडला, आलेल्या अर्जाची अनेकदा छाननी आणि अभ्यास करण्यात आला. या प्रक्रियेनंतर अजुनही शेतकऱ्यांच्या पदरात काही पडले नाही.


Comments

Top