• 20 of March 2018, at 7.12 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

राम मंदिर सभागृहाचे आ. अमित देशमुख यांनी केले लोकार्पण

श्रीराम मंदीर लातूरचे शक्तीपीठ, सत्ताधारी आणतात विकास कामात अडथळे!

राम मंदिर सभागृहाचे आ. अमित देशमुख यांनी केले लोकार्पण

लातूर: राम गल्ली लातूर येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम मंदिरास माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आमदार निधीतून सभागृह बांधण्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. या सभागृहाचा लोकार्पण सोहळा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून राजाभाऊ जोशी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, माजी महापौर तथा नगरसेवक अॅड.दिपक सुळ, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, समद पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, ब्लॉक अध्यक्ष संजय निलेगावकर, माजी नगरसेवक रमेश बिसेन, नगरसेविका मिनाताई लोखंडे, बाळासाहेब देशपांडे, काँग्रेस मिडीया सेलचे हरिराम कुलकर्णी, महेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरचे श्रीराम मंदिर हे प्राचीन मंदीर असून लातूर शहराचे ते शक्तिपीठ आहे. लातूरचा चौफेर विकास होत असताना या शक्तिपीठाचाही विकास झाला पाहिजे, या भूमिकेतून मंदिर सभागृहास निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. सध्याचा सत्ताधार्‍यांचा विकासाबाबत संकुचित विचार आहे. केवळ विरोधी पक्षाने मागणी केल्यामुळे विकास कामांना अडथळा आणण्याचे काम करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या सर्व घटनांत लातूरकरांचा विकास खुंटत आहे. हे आपण कदापीही सहन करणार नाही. स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी विशेष लक्ष घालून लातूरच्या विकासात पुढाकार घ्यावा अश सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जनतेनेही विकास कामात काँग्रेसपक्षाला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यातील व केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या धोरणावर टीका करताना आमदार देशमुख म्हणाले की, सध्या सत्ताधार्‍यांचा आत्मविश्वास ढळत आहे. त्यांची कोणतीही योजना यशस्वी होत नाही. तीच गत लातूरच्या मनपा सत्ताधार्‍यांची झाली आहे. आगामी परिवर्तनाच्या लढाईत लातूरकरांनी पुढाकार घ्यावा लागणार आहे. सध्या लातूरकरांवर जाचक कर प्रणालीचा बोजा टाकण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात असा बोजा कधीही टाकला नाही. लातूरकरांना त्रास होईल असे कोणतेही काम करण्यात आले नव्हते. सध्याच्या सत्ताधार्‍यांची नाळ सामान्य माणसांशी जोडलेली नाही. लातूरकरांसाठी महत्त्वाची असलेली रेल्वेही लातूरला थांबविण्याचे कौशल्यही त्यांना दाखवता आले नाही असे म्हणून आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाचा खरपुस समाचार घेतला. विकासाच्या मार्गावर दमदार वाटचाल करण्यासाठी लातूरकर काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सभागृहाचे फीत कापून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभागृहाचे लोकार्पण केले. श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने आमदार अमित देशमुख आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निलेगावकर यांनी केले. गोरोबा लोखंडे, माजी महापौर दीपक सूळ व स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार आरजी जोशी यांनी मानले. यावेळी श्रीराम मंदिर संस्थानचे विास्त शामराव सुर्यवंशी, दत्तोपंत कुलकर्णी, आरजी जोशी, दिनकर प्रयाग, वामनराव संदीकर तसेच दगडुअप्पा मिटकरी, गोरोब लोखंडे, शिवप्पा कोरके, नेताजी बादाडे, बबन औसेकर, प्रसाद उदगीरकर, मुन्ना राजे, अनंतराव पाठक, प्रविण राजे, दीपक कोटलवार, सुपर्ण जगताप, सुरज राजे, कुणाल वागज, जफर नाना, जय ढगे, जफर सय्यद, राम गोरड आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top