HOME   व्हिडिओ न्यूज

सोयाबीनचे भाव अजून दिडशेंनी वाढणार- सभापती शहा

शेतकर्‍यांच्या चुकांमुळे सोयाबीनचे अनुदान पडून


लातूर: ज्या सोयाबीनच्या अनुदानासाठी मागच्या अनेक महिन्यांपासून ओरड सुरु होती. ते अनुदान आले आहे. त्यातील एक कोटी तीन लाख पंधरा हजार रुपये एवढे अनुदान वितरणाविना पडून आहे. शेतकर्‍यांच्या अनुदान मागणीच्या अर्जात अनेक त्रुटी असल्याने हे वाटप केले जात नाही अशी माहिती लातूर बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी दिली. अनेक शेतकर्‍यांच्या अर्जात बॅंकांची नावे आहेत पण शाखांचा उल्लेख नाही अशा मोठ्या चुका आहेत. एक कोटीचे अनुदान जिल्ह्याचे आहेत. त्यात लातुरचे केवळ ५२ लाख रुपये आहेत. ज्यांचे अनुदान राहिले आहे अशा शेतकर्‍यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सोयाबीनचे भाव अजून दिडशेनी वाढणार
अलिकडे सोयाबीनच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. आज कमाल भाव ३२३२ रुपये एवढा होता. ज्या शेतकर्‍यांनी शेतमाल तारण योजनेत सोयाबीन ठेवले त्यांचा चांगला फायदा झाला. अजुनही ही संधी आहे. क्विंटलमागे दोन हजार रुपये दिले जातात. यामुळे शेतकर्‍यांची तातडीची गरज भागते. भाव वाढल्यानंतर आणखी फायदा होतो. आज ३२३२ भाव होता. यात आणखी १४० ते १५० रुपयांची वाढ होऊ शकते असेही ललितभाईंनी सांगितले. २०१४ मध्ये सोयाबीनला ४५३१ रुपये एवढा मिळाला होता.


Comments

Top