• 20 of March 2018, at 7.35 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

विलासराव देशमुख युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे

विलासरावांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचा पदाधिकार्‍यांचा निर्धार

विलासराव देशमुख युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे


लातूर: विलासराव देशमुख युवा मंचच्या नूतन प्रभाग अध्यक्ष व पदाधिकारी यांची नुकतीच निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी गुरुवार बाभळगाव निवासस्थानी आमदार अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचाराचा वारसा पुढे घेवून जाण्यासाठी युवा मंचची स्थापना करण्यात आली आहे. विलासराव देशमुख युवा मंचच्या माध्यमातून सहकार, कृषी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विविध समाज उपयोगी कामे केली जातात. विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने लातूर शहरातील विविध प्रभागात प्रभाग अध्यक्षांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. विलासराव देशमुख युवा मंच शहर सचिवपदी गोविंद पवार, प्रभाग ०६ च्या अध्यक्षपदी राकेश डोंगरे, प्रभाग १८ च्या अध्यक्षपदी भरत साखरे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. लोकनेते विलासराव देशमुख यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष प्रविण घोटाळे, जिल्हा सरचिटणीस सुंदर पाटील कव्हेकर, सिंकदर पटेल, आदम शेख, नेताजी बादाडे उपस्थित होते.


Comments

Top