• 20 of March 2018, at 7.17 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

शिवरायांच्या अवमानाच्या निषेधार्थ किल्लारीत कडकडीत बंद

फेसबुकवर अवमानकारक पोस्ट टाकणार्‍या बाळेश्वर कांबळेला अटक

शिवरायांच्या अवमानाच्या निषेधार्थ किल्लारीत कडकडीत बंद

औसा: किल्लारी आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजी महाराजांबद्दल फ़ेसबुकवर आक्षेपार्ह लेखन केल्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे किल्लारी व नांदुर्गा परिसरात आज दिवसभर बंद पाळण्यात आला. काल एका माथेफ़िरु तरूणाने फ़ेसबुकवर भिडे गुरुजींचे डोके शिवाजी महाराज तलवारीने उडवतानाचा फ़ोटो व त्यांच्या वरची टॅगलाईनमध्ये महारांजाबद्दल अश्लाघ्य शब्दांचा वापर केला. ०९ जानेवारी रोजी नांदुर्गा येथील बाळेश्वर कांबळे या तरूणाने हा प्रकार केला होता. किल्लारी गावातील बाजारपेठा, शाळा बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला. ही बातमी समजल्यानंतर पोलिसांनी या तरूणास ०९ तासात अटक केली. त्यामुळे सर्वत्र शांतता ठेवण्यात पोलिसांना यश आले. दिवसभर आज किल्लारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर दखल पोलिसांकडून घेतली.


Comments

Top