HOME   लातूर न्यूज

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड बुध्दीमत्ता- धीरज देशमुख

तांदुळजाच्या कार्यक्रमात धाडसी मातांचा गौरव


ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड बुध्दीमत्ता- धीरज देशमुख

लातूर: बौध्दीक विकासाला स्थळ, काळाची कसलीही अडचण नसते. हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनेकवेळा सिध्द करून दाखवलेले आहे. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आता शहरापुरता राहिला नसून तो ग्रामीण भागतही पोहचला आहे. शिक्षकांकडील ज्ञान, पालकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रगल्भ बुध्दीमत्ता दिसून येऊ लागली आहे. भविष्यात हे विद्यार्थी उच्च पातळीपर्यंत पोहचतील, असा विश्वास लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील फिनिक्स मॉडेल प्रायमरी इंग्लिश स्कूल, यश इंग्लिश स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पायाभूत विकासाचा शैक्षणिक प्रकल्पअंतर्गत ७२०० स्क्वेअर फुटाची महारांगोळी, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला व पाककला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जगदीश बावणे होते. या कार्यक्रमात धाडसी माता पुरस्काराने शारदा रंगनाथ गंगणे, अयोध्या भगवान वाघचौरे यांचा गौरव धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विद्यमान व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, संचालक रवी काळे, वलायतखॉ पठाण, जगदीश चोरमले, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे, व्यंकट पिसाळ, कैलास पाटी, अमोल भिसे, बाळू माने, विनोद माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Top