logo
news image कल्पना गिरी प्रकरणातील महेंद्रसिंह चौहानला सशर्त जामीन, मात्र लातूर जिल्ह्यात प्रवेशबंदी news image उदगीर: जगाने बंदी घातलेल्या मोदींना संघाने पंतप्रधान केले- प्रकाश आंबेडकर news image मराठा आरक्षण प्रकरणी ओबीसी संघटनेची आज जागर बैठक news image योगेंद्र यादव महा आघाडीत जाणार नाहीत news image मराठा आरक्षण विरोधी जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी news image कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना राहणार तटस्थ, नगरसेवक सहलीला news image सांगलीतील मुक्त विद्यापिठाच्या वर्गात मित्रानेच मैत्रीणीची केली बेंचवर डोके आपटून हत्या news image सीएम चषक स्पर्धेत १२ क्रीडा प्रकार, जालन्यात झाले उदघाटन news image कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा सुरु news image उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन news image नेवास्यात शेतकर्‍याने दीड टन कांदा वाटून टाकला, दानपेटी ठेवली, त्यातले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवणार news image निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानचे ५०० कोटी. निळवंडेकरांनी काढली नतनस्तक रॅली news image धुळे व नगर महापालिकांचे आज निकाल, साडेअकरापर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता news image राम मंदिरासाठी केंद्राने कायदा करावा यासाठी संघाकडून दबाव news image नव्या वर्षात तूरडाळ, हरभरा डाळीसह उडीद डाळी गाठणार शंभरी

HOME   लातूर न्यूज

काँग्रेसचे श्रेय भाजपने लाटण्याचा प्रयत्न : अशोक गोविंदपूरकर

काँग्रेसचे श्रेय भाजपने लाटण्याचा प्रयत्न : अशोक गोविंदपूरकर

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपपेक्षा विरोधी पक्षात असलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विकास कामे मोठ्या प्रमाणांत करीत असून भाजपने काँग्रेस करीत असलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शहरातील शिवाजी चौक ते बार्शी रोड रस्त्यांवरील दुभाजकांत शोभेची झाडे लावून तो परिसर स्य्शोभित करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हा रस्ता सुशोभित करण्याचे काम शहरातील सनरीच करीत आहे. त्यावेळी अशोक गोविंदपूरकर बोलत होते. आमदार अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहर मनपाच्या स्थायी समितीच्या पुढाकाराने शहरातील विविध भागांतील हरितपट्टे, शहराच्या मुख्य रस्त्यांवरील रस्ता दुभाजक सुशोभिकरणाचे काम लोकसहभागातून करून घेतले जात आहे. याकामी मनपाच्या तिजोरीतील एक पैसाही खर्च केला जात नाही. यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसह सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगून अशोक गोविंदपूरकर म्हणाले की, या कामाला आता मूर्त रूप येत असल्याचे पाहून या कामाचे श्रेय लाटण्याचा दुबळा प्रयत्न भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून तसेच त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. वास्तविक पाहता या सुशोभीकरण कामी भाजपचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही. ही बाब भाजपच्या महापौरानीही यापूर्वी मान्य केली होती पण, आता विकास कामे होताना पाहून त्याचे श्रेय लाटण्यासाठी मात्र सत्ताधारी पुढे येताना दिसतात, ही बाब योग्य नाही. मनपात सत्तेत असतांनाही भाजप शहराच्या विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करू शकत नाही. उलट काँग्रेस करीत असलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांची चालू असलेली धडपड केविलवाणी असल्याचा टोलाही गोविंदपूरकर यांनी यावेळी लगावला. शहराच्या अनेक भागांत हा अभिनव उपक्रम राबवला जाणार असून इच्छुक संस्था, व्यावसायिकांनी यात सहभागी होण्यासाठी आपणांस अथवा मनपा आयुक्तांशी संपर्क साधावा असे आवाहनही गोविंदपूरकर यांनी केले आहे. याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, रामकिशन मदने, महेश काळे, शंकर गुट्टे, बिभीषण सांगवीकर, नेताजी बादाडे, असलम शेख, एम.एच. शेख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Comments

Top