HOME   टॉप स्टोरी

कव्हा बलात्कार प्रकरण: पिडीतेचं कुटुंब दहशतीखाली, जगणे कठीण

वारंवार येतात धमक्या, ठेवली जाते पाळत, कुणाला भेटण्याचीही सोय नाही


लातूर: लातुरजवळच्या कव्हा गावात पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. यातल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, आरोपीचे कुटुंबही गाव सोडून गेले पण उरलेले नातलग पिडितेच्या कुटुंबाला त्रास देत आहेत. पिडीतेच्या वडिलांना आरोपीचे काका सतत धमकावतात, तू गावात कसा राहतोस, तुला बघून घेतो अशा धमक्या दिल्या जातात असे गावातील काही मंडळी आणि पिडितेचे वडीलही सांगतात. हे प्रकरण दाबून ठेवण्यात आलं, माध्यमातही आले नाही, पोलिस हवं तसं सहकार्य करीत नाहीत. आमच्यावर सतत पाळत ठेवली जाते, कुणाला भेटू दिले जात नाही असा पिडीतेच्या वडिलांचा आरोप आहे. पिडीतेच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी गावातील काही मंडळी करतात. जातीय तेढ वाढू नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत, महिला अधिकार्‍याकडून तपास चालू आहे एवढीच माहिती पोलिस देतात.


Comments

Top