HOME   व्हिडिओ न्यूज

मनपाची १९ तारखेची सर्वसाधारण सभा रद्द करा, कॉंग्रेस नगरसेवकाची मागणी


लातूर: येत्या १९ जानेवारीला लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. टिपण्णी न मिळाल्याने ही सभा रद्द करावी अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी केली आहे. या सभेचा अजेंडा मिळाला, इतिवृत्त्तही मिळाले पण टिपण्णी मिळाली नाही असे मस्के यांचे म्हणणे आहे. याबाबतचे पत्र मस्के यांनी आयुक्त आणि महापौरांना दिले आहे. टिपण्णी न मिळाल्याने विषय सूचीमधील विषयांवर अभ्यास करुन बोलणे शक्य होणार नाही. मग जनतेचे प्रश्न मांडायचे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ही सर्वसाधारण सभा रद्द करावी आणि टिपण्णी वितरीत केल्यानंतरच सभा बोलवावी अशी मागणी मस्के यांनी केली आहे.


Comments

Top