HOME   लातूर न्यूज

लातुरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडून अतिरिक्त १०० कोटींची मागणी


लातुरच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडून अतिरिक्त १०० कोटींची मागणी

लातूर: जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ ची राज्यस्तरीय बैठक राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी १७८.४० कोटींचा प्रारुप आराखडा असून या व्यतिरिक्त १०० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी कामगार कल्याण, कौशल्य विकास, भुकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री अर्जुन खोतकर वित्त व नियोजन विभागाचे अपर सचिव श्री. चक्रवर्ती, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदिसह सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. यावेळी वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लातूर जिल्हा प्रशासनामार्फत चालवल्या जाणा-या स्पर्धा परीक्षा केंद्र या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. व हा उपक्रम चांगला असून विद्यार्थ्यांना पुस्तकेही उपलब्ध करावीत अशी सूचना त्यांनी यावेळी केली. मागणी केलेल्या वाढीव निधीतून देण्यात येणारा निधी हा आरोग्य, शिक्षण व जलसंधारणाच्या कामावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा असे सांगून देवणी येथील वळू संशोधन केंद्रास ०८ कोटीचा निधी मुनगंटीवार यांनी मंजूर केला.


Comments

Top